
पाटण: कोयना विभागातील घाटमाथा परिसरातील ढाणकल येथील शिवाजी पुनाजी कदम (वय ६०) या शेतकऱ्यावर शुक्रवारी (ता. २६) गव्याने अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांच्यावर हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कऱ्हाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.