

From Farm to Courtroom: Aishwarya Yadav’s Inspiring Success Story
Sakal
तारळे: जिद्द, चिकाटी व सातत्यपूर्ण अभ्यास याच्या जोरावर काले (ता. कऱ्हाड) येथील ऐश्वर्या चंद्रकांत यादव यांनी न्यायाधीशपदाला गवसणी घातली. अत्यंत अवघड असलेली परीक्षा त्या पहिल्याच प्रयत्नात राज्यात बाराव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून त्या राज्यात पहिल्या आल्या आहेत. सातारा जिल्ह्यात केवळ दोघा- तिघांना हे यश मिळाले आहे. त्यात ऐश्वर्या यादव यांचा पहिला नंबर आहे. त्यांच्यावर संपूर्ण कऱ्हाड तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.