

Maharashtra Rank 6: Javali’s Shivani Makes Farmer Family Proud
Sakal
-संदीप गाडवे
केळघर : भुतेघर (ता. जावळी) येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील शिवानी सुरेश मानकुंबरे हिची भारतीय हवाई दलात निवड झाली आहे. दुर्गम छोट्या गावांतील शिवानीने अथक व कठोर परिश्रमातून यशाला गवसणी घालत स्वप्नवत कामगिरी केली. ती भारतीय हवाई दलात निवड होणारी जावळी तालुक्यातील पहिलीच मुलगी आहे.