

GI Tag Violation Sparks Outrage Among Strawberry Farmers; Agitation Looms”
Sakal
भिलार: महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीला ‘जीआय टॅग’ मिळून अनेक वर्षे झाली. या स्ट्रॉबेरीमध्ये असणारे गुणधर्म इतर तालुक्यात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीपेक्षा वेगळे असून, तालुक्यात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीची चव व गोडी वेगळी असल्याचे जाणवते. मात्र, काही तालुके व जिल्ह्यांत स्ट्रॉबेरीची शेती केली जाते. त्यात उत्पादित होणाऱ्या स्ट्रॉबेरीला सर्रास ‘महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी’ असे नाव देऊन बाजारपेठेत विक्री होताना दिसत आहे. याविरोधात महाबळेश्वरमधील सर्व स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.