
-मनोज पवार
दुधेबावी: फलटण तालुक्यातील शेतकरी मागील दोन वर्षांपासून ऊस व मका या पिकाबरोबर फळबाग लागवडीला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ५२७ हेक्टर फळबाग लागवड क्षेत्र वाढले आहे. यामध्ये डाळिंब, सीताफळ, पेरू, ड्रॅगन फ्रूट, वॉटर अप्पल, आंबा, अॅव्होकाडो, केळी, द्राक्ष आदी फळबागांचा समावेश आहे.