

Shivde Protest: Farmers stop road widening work demanding pending land compensation.
Sakal
उंब्रज: शिवडे (ता. कऱ्हाड) येथील पाटण-पंढरपूर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम शेतकरी व ग्रामस्थांनी आज बंद पाडले. रस्ता रुंदीकरण होत असलेल्या भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी, व्यावसायिक, ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने स्थानिकांचा विरोध डावलून रुंदीकरणाचे काम सुरू ठेवल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट निर्माण झाली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शिवडेतील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.