

Satara Accident
सातारा: औद्योगिक वसाहत परिसरातील परफेक्ट कंपनीसमोर अनोळखी ट्रकने चिरडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. ओंकार जयवंत गवळी (वय २०, रा. भोसले कॉलनी, कोडोली) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रथमेश प्रशांत माने (रा. कोडोली) याच्या फिर्यादीनुसार अनोळखी ट्रक चालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.