Borgav Accident: घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाचा वेग जास्त असावा आणि ट्रॉलीवरील परावर्तक किंवा लाईट कमी दिसत असल्याने अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. उसाच्या हंगामात रस्त्यांवर ट्रॅक्टर-ट्रॉलींची मोठी वर्दळ असल्याने अशा दुर्घटना वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
रहिमतपूर : बोरगाव मार्गावर पाटील दरबार हॉटेलजवळ उसाने भरलेल्या ट्रॅक्टर- ट्रॉलीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विठ्ठल आबाजी भोसले (वय ६०, रा. रहिमतपूर) असे त्यांचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली.