विलासपुरला मिळणार हजार लस?; पठाणांच्या मागणीची आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडून दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Feroz Pathan

विलासपुरला मिळणार हजार लस?; पठाणांच्या मागणीची आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडून दखल

सातारा : विलासपूर येथील जनतेच्या सोयीसाठी त्या भागात लसीकरण (Corona Vaccine) केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाचे अध्यक्ष फिरोज पठाण (Feroz Pathan) यांनी पत्रकाव्दारे जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांच्याकडे केली आहे. याच पत्रकात त्यांनी विलासपूर येथील केंद्रासाठी 1 हजार लस खरेदीची तयारी दर्शवली असून, पठाण यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंनीही (Shivendraraje Bhosale) जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र दिले आहे. (Feroz Pathan Demand For Vaccination Center At Vilaspur Satara Marathi News)

हद्दवाढीनंतर विलासपूर हा भाग सातारा पालिकेत आला असून, याठिकाणी ग्रामपंचायत सध्या बरखास्त आहे. नागरिकांना शासनाने जाहीर केलेली कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी गोडोली येथे यावे लागत आहे. याठिकाणी असणारा उपलब्ध साठा आणि होणारी गर्दी यांचे प्रमाण व्यस्त असल्याने विलासपूर येथील नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी पठाण यांनी निवेदनात केली आहे.

हेही वाचा: रिक्षाचालकांनाे! सरकार तुमच्या खात्यात करणार पैसे जमा

या केंद्रासाठी शासनाकडील लस उपलब्ध न झाल्यास खासगी रुग्णालयाकडील लस उपलब्ध करून देण्याची तसेच त्या एक हजार लशींसाठी येणारा खर्च स्वत: करण्यास तयार असल्याचेही पठाण यांनी पत्रकात नमूद केले आहे. मागणीवर योग्य कार्यवाही करत विलासपूर ग्रामपंचायत कार्यालयात लसीकरण केंद्र न उभारल्यास आंदोलनाचा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे.

निराधार, कष्टकऱ्यांसाठी 'आई'चा आधार, भुकेल्यांसाठी भरविला जातोय मायेनं 'आहार

Feroz Pathan Demand For Vaccination Center At Vilaspur Satara Marathi News

loading image
go to top