Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

New Digital System for Subsidized Fertilizer Distribution : आधार, सातबारा आणि पिकांच्या माहितीनुसार खतांचा कोटा निश्चित होणार असून, QR कोडद्वारे अधिकृत विक्रेत्याकडून खत खरेदी करता येणार आहे.
Fertilizer Allocation System

Fertilizer Allocation System

esakal

Updated on

ईश्वरपूर : अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ ही डिजिटल प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीद्वारे खतांची ऑनलाइन पूर्वनोंदणी, आधारद्वारे शेतकऱ्यांची पडताळणी, पिकनिहाय खत कोटा निश्चिती आणि क्यूआर कोडद्वारे खरेदी करता येणार आहे. त्यामुळे काळाबाजार, साठेबाजी आणि खतासाठी होणारी गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी इश्‍वरपुरातील वाळवा पंचायत समिती येथे २१ सप्टेंबरला तालुक्यातील अनुदानित रासायनिक खत विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण घेण्यात आले. जिल्हा परिषद कृषी विभागाचे मोहीम अधिकारी अमोल आमले, तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी पाटील, संजय बुवा तसेच वाळवा तालुका सीड्स, पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Fertilizer Allocation System
Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

आधार, सातबारा, पिकानुसार कोटा रसायने व खते मंत्रालय तसेच कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पुढाकारातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अधिकृत भूमी अभिलेख प्रणाली आणि ॲग्रीस्टॅकशी जोडणी असल्याने शेतकऱ्याचा आधार क्रमांक, जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकांची माहिती यावरून खतांची गरज निश्चित करता येणार आहे.

Fertilizer Allocation System
Bijwadi Rain Shortage : उत्तर माणमधील बिजवडी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत; खरीपानंतर रब्बी हंगामही धोक्यात

तीन दिवसांत क्यूआर कोडद्वारे खरेदी अधिकृत संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपवर आधार क्रमांकाद्वारे नोंदणी करून शेतकऱ्यांना आवश्यक खतांची निवड करता येईल. त्यानंतर जवळच्या अधिकृत विक्रेत्याची निवड करून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर मिळालेला क्यूआर कोड तीन दिवसांत विक्रेत्याला दाखवून खत खरेदी करता येईल. खतविक्रीची प्रत्येक नोंद डिजिटल पद्धतीने होणार असल्याने वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com