esakal | सातारा : 'या' तालुक्यात फक्त मेडिकल व दवाखाने सुरू राहतील; प्रशासन सतर्क
sakal

बोलून बातमी शोधा

containment zone

सातारा : 'या' तालुक्यात फक्त मेडिकल व दवाखाने सुरू राहतील

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : खटाव तालुक्यातील (khatav) १३३ ग्रामपंचायतींपैकी ५० गावांतील हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण (covid19 patients) आढळून आले आहेत. रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी येत नसल्याने व बाधित रुग्ण उपचारासाठी शासकीय व खासगी रुग्णालयांत (hospital) दाखल करण्यात आलेले आहेत. यावर तत्काळ नियंत्रण म्हणून तालुक्यातील ५० गावे प्रतिबंधित (containment zone) म्हणून प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहेत. (fifty-villages-from-khatav-decleared-in-containment-zone-satara-news)

तालुक्यात आजअखेर १४ हजार १०४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२ हजार ६२० उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर ४२० जण कोरोना प्रादुर्भावाने दगावले आहेत. सद्या तालुक्यात एक हजार १७२ बाधित रुग्ण असून, ते मायणी, वडूज, औध, गुरसाळे, जिल्हा रुग्णालय व जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी उपचार घेत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेत त्यावर तत्काळ नियंत्रण करणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा गंभीर विचार करून व सदर रुग्णांच्या संपर्काचा संभाव्य परिसर म्हणून तालुका प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र व त्याच्या आसपासचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे.

हेही वाचा: 'तुम्हाला काय करायचं ते करा'; कोरोनाग्रस्त दांपत्याचं दहिवडीतून पलायन

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संबंधित पोलिस ठाणे भागाच्या हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्र सील करून त्या ठिकाणी २४ तास पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील कोरोनाबाधित क्षेत्रातील नगरपंचायत व ग्रामपंचायत हद्दीमध्ये वैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा वगळता अन्य व्यक्तींना संबंधित प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यास व परिसरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे.

Medical-Store

Medical-Store

सदर झोनमध्ये फक्त मेडिकल व दवाखाने सुरू राहतील. तर इतर सर्व आस्थापना बंद राहतील. आगामी खरीप हंगामाची तयारी लक्षात घेता कृषीविषयक औषधे, बी-बियाणे, रासायनिक खते व औजारे यांची विक्री सकाळी सात ते ११ या कालावधीत सुरू राहील. तसेच ११ ते पाच घरपोच सेवा देण्यास ही परवानगी राहील. याचप्रमाणे दूध संकलन केंद्र सकाळी सात ते नऊ व सायंकाळी पाच ते सात या कालावधीत सुरू राहतील. बँक व पतसंस्था यांचे कामकाज सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत सुरू राहील. मात्र, या काळात कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन गरजेचे असल्याचे तालुका प्रशासनाने जाहीर केले.

हेही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांचे धरणग्रस्तांकडे दुर्लक्ष; वर्षभरात कोयना टास्क फोर्सची बैठकच नाही!

खटाव तालुक्यातील प्रतिबंधित गावे

वडूज, खटाव, औंध, कातरखटाव, एनकूळ, बुध, मायणी, नढवळ, बोंबाळे, कटगुण, खबालवाडी, पुसेगाव, सिद्धेश्वर कुरोली, निमसोड, विसापूर, निढळ, कातळगेवाडी, दातेवाडी, म्हासुर्णे, पुसेसावळी, कलेढोण, दरुज, चितळी, हिंगणे, गुरसाळे, शिरसवडी, वडगाव, चोराडे, राजाचे कुर्ले, तडवळे, वरूड, कळंबी, मोळ, खातगुण, डिस्कळ, भांडेवाडी, गणेशवाडी, पडळ, त्रिमली, अंभेरी, गोपूज, खरशिंगे, जाखणगाव, धोंडेवाडी, पळशी, जांभ, खातवळ, कणसेवाडी, पांढरवाडी, येरळवाडी.

काही सुखद बातम्या वाचा