पत्नीच्या डोक्‍यात तवा घालून पती पाेलिसांत हजर

अशपाक पटेल
Wednesday, 20 January 2021

पुढील तपास शिरवळ पोलिस निरीक्षक उमेश हजारे व त्यांचे सहकारी करत आहेत.
 

शिरवळ (जि. सातारा)  : धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील अर्बन ग्राम सोसायटीमधील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मंगल अशोक पांचाळ (वय 60) या वृद्धेचा घरगुती वादातून वृद्ध पतीने डोक्‍यात लोखंडी तवा घालून खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे. खुनानंतर संशयित अशोक रामचंद्र पांचाळ (वय 66) स्वतःहून शिरवळ पोलिसांत हजर झाला.
 
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की मंगल पांचाळ, तसेच पत्ती अशोक पांचाळ हे दोघे धनगरवाडी (ता. खंडाळा) येथील अर्बन ग्राम सोसायटीमध्ये राहात असून, त्यांचा मुलगा पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. मंगल पांचाळ व अशोक पांचाळ यांच्यात घरगुती वाद निर्माण झाला. यामध्ये वादावरून चिडून जाऊन अशोक पांचाळ यांनी पत्नी मंगल पांचाळ यांच्या डोक्‍यात घरगुती वापराचा लोखंडी तवा मारला. घाव वर्मी बसल्याने मंगल पांचाळ गंभीर जखमी होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. खून केल्यानंतर अशोक पांचाळ स्वतःहून शिरवळ पोलिसांत हजर झाले. त्यांनी उपस्थित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पत्नीचा खून केल्याचे सांगितले.

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अशोक यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, याची फिर्याद त्यांचा मुलगा ऋषिकेश पांचाळ याने शिरवळ पोलिसात दिली आहे. यानुसार पोलिसांनी संशयित अशोक पांचाळला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास शिरवळ पोलिस निरीक्षक उमेश हजारे व त्यांचे सहकारी करत आहेत.

गगन भरारी! जागतिक विक्रमासाठी साताऱ्यातील पाच बाल वैज्ञानिकांची निवड

Bird Flu इफेक्ट : सातारा जिल्ह्यात दोन हजार कोंबड्यांची विल्हेवाट

रानगव्यांचा कासला पुन्हा गव गवा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight Between Couple In Dhangarwadi Khandala Satara Crime News