

Borrowers Allegedly Defraud Finance Firm of ₹2.5 Lakh in Satara City
Sakal
सातारा : धनगरवाडी (ता. सातारा) येथील फायनान्स कंपनीच्या कर्जदारांकडून मुदतपूर्व कर्ज वसुलीपोटी घेतलेली रक्कम कंपनीत न जमा करता दोन लाख ४३ हजार २८२ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. तुषार एकाराम नवगिरे (रा. धोतरी, ता. दक्षिण सोलापूर) असे त्याचे नाव आहे.