

Minister Shambhuraj Desai interacting with disaster-affected families in Nadoli village.
Sakal
मोरगिरी : नाडोली (ता. पाटण) येथे काल दुपारी तीनला चार राहत्या घरांना आग लागून नुकसान झाले. आगीत घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. वित्तहानी झाल्याने आपद्ग्रस्त कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नाडोलीत धाव घेऊन घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.