
Inauguration of five new buses at Koregaon depot to enhance passenger services.
Sakal
कोरेगाव: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगाव आगारात नवीन पाच बस दाखल झाल्या असून, त्यांचे लोकार्पण काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. अरुणा बर्गे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष दीपाली बर्गे यांच्या उपस्थिती झाले. नवीन बसद्वारे प्रवाशांचे अधिकाधिक हित जोपासले जाईल, असा विश्वास डॉ. बर्गे यांनी यावेळी व्यक्त केला.