Satara Monsoon Update : येरळवाडीत चक्क पावसाळ्यात उतरले फ्लेमिंगो..!

परतीच्या प्रवासात लावली हजेरी; तलावातील पक्षी वैभवात वाढ.
Flamingo bird
Flamingo birdsakal

कलेढोण - नेहमी थंडीच्या दिवसात हजेरी लावणाऱ्या अग्निपंख अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांनी येरळवाडी (ता. खटाव) येथील मध्यम प्रकल्पावर चक्क पावसाळ्यात हजेरी लावली आहे. तलावात सुमारे २५ ते २८ फ्लेमिंगोंनी आज (रविवार) सकाळी सातच्या दरम्यान हजेरी लावल्याचे येरळवाडीचे गणेश पाटोळे यांनी सांगितले.

या पक्ष्यांनी तलावावर पावसाळ्यात हजेरी लावली असली तरी, हे परतीच्या मार्गावरील फ्लेमिंगो असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ते पुन्हा प्रवासास सुरुवात करतील, असा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे.

Flamingo bird
Satara : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागु झालीच पाहिजे; बाळासाहेब थोरात

खटाव तालुक्यात येरळवाडी, मायणी, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलाव हे रोहित पक्षी थंडीत वास्तव्यात येतात. पेरू, चिली, मंगोलिया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडिज रांगांत तर भारतात कच्छच्या रणात फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात आढळतात. या भागात पडणाऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी हे पक्षी दुष्काळी तालुक्यात थंडीच्या दिवसात हजेरी लावतात.

Flamingo bird
Satara Politics : शरद पवार की अजित पवार? NCP पदाधिकाऱ्यांत द्विधावस्था; मुंबईत आज दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक

त्यांचे निरीक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणांसह स्थानिक भागातून पक्षीमित्र तलावावर दाखल होतात. अलीकडेच मायणी समूह पक्षी संवर्धनात येरळवाडी तलावाचे क्षेत्राचा समावेश केल्याने येरळवाडी तलावातील पक्षीसंपदेला चांगले दिवस आले आहेत. या तलावात ग्रे हेरॉन, चंडोल, नदीसुरय, चित्रबलाक, काळा-पांढरा आवाक या स्थानिक पक्ष्यांसोबतच फ्लेमिंगोने हजेरी लावल्याने तलावाचे पक्षीसौंदर्य बहरले आहे.

थंडीच्या दिवसात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुमारे चार ते पाच फुटाचे लांब-काडीसारखे गुलाबी पाय, इंग्रजीतील ‘एस’ आकारासारखी बाकदार मान, वरून पांढरा-आतून गुलाबी असा पंखाचा रंग, केळीच्या आकारासारखी गुलाबी चोच, दुपारच्या उन्हाला पाठीवरच्या पंखात मान खुपसून बसणारे फ्लेमिंगोंना पाहणे, कॅमेराबद्ध करणे हे पक्षीमित्रांसाठी पर्वणी असते. यंदा या फ्लेमिगोंनी थंडीत तलावावर हजेरी लावली नसली तरी, परतीच्या प्रवास काळात त्यांनी येरळवाडी तलावास पसंती दिली आहे.

Flamingo bird
Satara News : आयुर्वेदिक काढ्याने घेतला बाप-लेकाचा जीव! घटनेने परिसरात हळहळ… नेमकं काय झालं?

आणखी काही दिवसांची विश्रांती घेऊन हे पक्षी आपल्या मूळच्या ठिकाणच्या प्रवासास सुरुवात करतील, असा अंदाज पक्षीमित्रांनी व्यक्त केला आहे. सध्या येरळवाडी तलावात पंचगंगा नावाच्या टेकडीजवळ हे २५ ते २८ पक्षी वास्तव्यास असून, सकाळी ते तलावाकडील भागात दिसून येत असल्याचे स्थानिक रहिवासी गणेश पाटोळे यांनी सांगितले. तलावातील पाण्याची पातळी खालावल्याने सुरक्षिततेसाठी हे पक्षी तलावातील मध्यवर्ती ठिकाणच्या टेकडीवर दिसून येत आहेत.

परतीच्या प्रवासातील हे पक्षी काही दिवस येथे वास्तव्य करतील. त्यानंतर ते पुढच्या प्रवासास सुरुवात करतील. या पक्ष्यांनी परतीच्या प्रवासात येरळवाडी ठिकाण निवडले, हे खूप महत्त्वाचे आहे.

- प्रा. डॉ. सुधीर कुंभार, पक्षीमित्र - कऱ्हाड

Flamingo bird
Satara Crime : मध्यरात्री डाॅक्टरच्या घरावर दरोडा; तलवारीचा धाक दाखवून लाखोंची केली लूट

या अगोदरही अनपेक्षितरीत्या येरळवाडी प्रकल्पावर रोहित पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. परतीच्या प्रवासातील फ्लेमिंगो आणि मायणी समूह पक्षी संवर्धनातील येरळवाडीचे नाते घट्ट असल्याचे दिसून येत आहे.

- प्रा. डॉ. श्‍यामसुंदर मिरजकर, अध्यक्ष, दि ग्रे हॉर्नबिल नेचर क्लब, मायणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com