Satara Politics : शरद पवार की अजित पवार? NCP पदाधिकाऱ्यांत द्विधावस्था; मुंबईत आज दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक

जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत शरद पवार की अजित पवार, अशी द्विधावस्था कायम आहे.
Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawaresakal
Summary

शरीराने सर्वजण शरद पवार यांच्यासोबत असले, तरी अनेकांच्या मनात चलबिचल आहे.

सातारा : खासदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) शक्तिप्रदर्शनानंतर जिल्ह्यातील अजित पवार यांच्यासोबत कोण आणि शरद पवार यांच्यासोबत कोण? याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अडीचशे ते तीनशे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आम्ही शरद पवारांसोबतच असल्याबाबतची प्रतिज्ञापत्रे घेतली असून, ती आज (बुधवारी) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये होणाऱ्या बैठकीत सादर करणार आहेत.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Kagal Politics : 'सासूसाठी भांडत बसलो अन् सासूच वाट्याला आली'; मुश्रीफांच्या भूमिकेमुळं समरजितांची मोठी कोंडी

तर अजित पवार यांच्या बाजूकडूनही बैठकीसाठी निमंत्रणे देण्यात आलेली आहेत. त्यामुळे दोन्हीपैकी कोणत्या बैठकीला कोण जाणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत शरद पवार की अजित पवार, अशी द्विधावस्था कायम आहे.

शरीराने सर्वजण शरद पवार यांच्यासोबत असले, तरी अनेकांच्या मनात चलबिचल आहे. आज (बुधवारी) खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दुपारी एक वाजता बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पदाधिकारी रवाना झाले आहेत.

तसेच पक्षाच्या अडीचशे ते तीनशे पदाधिकाऱ्यांकडून आम्ही शरद पवारांसोबतच असल्याची प्रतिज्ञापत्रेही घेतली आहेत. आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी राष्ट्रवादी भवनात थांबून सर्व नियोजन केले.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा जिल्ह्यात मोठा गट आहे. त्यांचीही बैठक आज (बुधवारी) मुंबईत आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी रात्रीच रवाना झाल्याचे सांगण्यात आले. आता दोन्ही बैठकींपैकी कोण कोणत्या बैठकीत दिसणार, यावर जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार की अजित पवारांसोबत, हे स्पष्ट होणार आहे.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Karad : एकनाथ शिंदेंना बाजूला करुन अजित पवारांना मुख्यमंत्री करतील; पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट

मकरंद पाटील नेमके कुठे जाणार?

अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असलेले आमदार मकरंद पाटील हे दुसऱ्या दिवशी खासदार शरद पवार यांच्यासोबत कऱ्हाड व साताऱ्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. आता आज (बुधवारी) शरद पवार व अजित पवार या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची स्वतंत्र बैठक मुंबईत होत आहे. त्यामुळे मकरंद पाटील कोणाच्या बैठकीला उपस्थित राहणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

दादांची भूमिका पटली नाही : सुनील माने

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांवर आमचे प्रेम आहे; पण भाजपसोबत जाण्याची अजितदादांची भूमिका आम्हाला पटलेली नाही. खासदार शरद पवार यांनी पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उभे करून त्यांना ताकद दिली. त्यामुळे आम्ही शरद पवारसाहेबांसोबतच राहणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar vs Ajit Pawar
Sharad Pawar vs Ajit Pawar

दादांच्या अभिनंदनच्या बॅनरवर पवारसाहेबांचा फोटो

सातारा शहरात अजित पवारांच्या अभिनंदनाचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बॅनर झळकले. या बॅनरवर खासदार शरद पवार, अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राष्ट्रवादीच्या नवीन नऊ मंत्र्यांचे फोटो लावण्यात आले होते. असे तीन ते चार बॅनर शहरातील विविध ठिकाणी लावले होते. हे बॅनर कोणी लावले, याबाबत चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडून हे बॅनर लावले नसल्याचे सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com