'निवडणुकीत तिकीट फिक्स समजू नका; आता पॅरामीटर लावूनच तिकीट'

Ramraje Nimbalkar
Ramraje Nimbalkaresakal
Summary

आता कोणत्याही क्षणी नगरपालिका निवडणूक लागेल अशीच सद्य स्थिती आहे.

फलटण (सातारा) : सध्या फलटण शहरात नगरपालिका निवडणुकीचे (Phaltan Municipal Election) वारे वाहू लागले आहे. आताच्या असलेल्या कोणत्याही नगरसेवकांनी व नगरसेविकांनी माझं पुढचं तिकीट फिक्स आहे, असं गृहीत धरू नये. झालेले काम, केलेले काम यासह इतर पॅरामीटर लावूनच यंदाच्या नगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटप करण्यात येणार आहे, असे स्पष्ट मत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Nimbalkar) यांनी व्यक्त केले.

फलटण येथील मंगळवार पेठ येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभात रामराजे बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा नीता मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, नगरसेविका सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोर नाईक-निंबाळकर, सनी अहिवळे, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, नगरसेविका वैशाली अहिवळे, सुवर्णा खानविलकर, ज्योत्स्ना शिरतोडे, प्रगती कापसे, दीपाली निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Ramraje Nimbalkar
..त्या उदयनराजेंवर मला काहीच बोलायचं नाही : अजित पवार

रामराजे पुढे म्हणाले, आता कोणत्याही क्षणी नगरपालिका निवडणूक लागेल अशीच सद्य स्थिती आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षांमध्ये फलटण शहराचा टप्प्पाटप्प्याने विकास पूर्णत्वास नेहलेला आहे. १९९१ साली नगराध्यक्ष असताना जे फलटणचे स्वप्न बघितले आहे. त्या दृष्टीनेच विकासकामे करत फलटण हे एक आयडियल शहर बनवण्याचा माझा मानस आहे. गेल्या जवळपास दोन वर्षे कोरोना या महाभयंकर विषाणूशी आपण सर्वजण लढत आहोत. आता कुठेतरी कोरोनाची साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत. कोरोनाच्या बाबतीतली काळजी आपल्याला ह्या पुढे सुद्धा घ्यावी लागणार आहे. मास्क घालणे, हात वारंवार धुणे व सामाजिक अंतर पाळणे या मुळेच कोरोनाची साथ आटोक्यात येत आहे. फलटण शहरामध्ये लसीकरण सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. तरी नागरिकांनी मला काहीही होणार नाही, ह्या भ्रमामध्ये राहू नये व काळजी घ्यावी, असे आवाहनही रामराजेंनी केले.

Ramraje Nimbalkar
राजकारणात ज्यांच्यावर विश्वास टाकला, त्यांनीच दगा दिला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com