

Growing Leopard Movement in Satara: 316 Villages Affected
sakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड : जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यांत मानव-बिबट्याचा संघर्ष वाढतो आहे. तो रोखण्यासाठी वन विभागाने पावले उचलली आहेत. वन विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार, जिल्ह्यातील ३१६ गावांमध्ये बिबट्याचा रोजचा वावर अधोरेखित झाला आहे. त्यात सर्वाधिक कऱ्हाड तालुक्यातील ११९ गावांत, त्यापाठोपाठ पाटणला ६०, तर साताऱ्यातील ४५ गावांत बिबट्याचा रोजचा वावर आहे.