ट्रेकर्सहाे! वासोट्याच्या सुरक्षित पर्यटनासाठी वन विभाग सज्ज

ट्रेकर्सहाे! वासोट्याच्या सुरक्षित पर्यटनासाठी वन विभाग सज्ज

कास (जि.सातारा) ः कोरोना परिस्थितीमुळे सर्व आवश्‍यक खबरदारी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पर्यटन सुरू करण्याच्या सूचना आल्या आहेत. बामणोली वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटक व वन कर्मचाऱ्यांसाठी आवश्‍यक खबरदारीसाठी तयारी करण्यात आली आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ल्यावर पर्यटनास परवानगी देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या संख्येने वासोटा ट्रेकिंगसाठी येत आहेत. त्यामुळे वन विभागाने मेट इंदोली येथे गर्दीवर नियंत्रण व सुरक्षित अंतरासाठी बांबूचे बॅरिकेटस उभे केले आहेत.

त्यातून पर्यटकांची गर्दी झाल्यास योग्य अंतर राखून नियोजन करता येऊ शकेल. ठिकठिकाणाहून पर्यटक वासोट्यास भेट देण्यासाठी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर स्टॅंड, फेस मास्क, हॅंड ग्लोव्हज्‌, फेस शिल्डची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटकांची तपासणी करण्यासाठी पल्स ऑक्‍सिमीटर, तापमान गण तयार ठेवल्या आहेत. पर्यटकांची मागील 14 दिवसांचा प्रवासाबाबतचा तपशील नोंदवण्यात येणार आहे.

ट्रेकर्सला खुणावणारा आणि घनदाट जंगलातला वासोटा किल्ला
 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोविडसदृश लक्षणे असलेल्या पर्यटकांना सहल व पर्यटनस्थळी येण्यास प्रतिबंध आहे. पर्यटकांनी योग्य ती खबरदारी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन बामणोलीचे वन क्षेत्रपाल बी. डी. हसबनीस यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com