

Prithviraj Chavan,
sakal
कऱ्हाड: पालिकांच्या निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सभा घेऊन प्रचार करणार आहे. जेथे आघाडी केली, त्या ठिकाणीही प्रचार सभा घेण्याचा प्रयत्न राहील. गल्लीबोळात फिरणे शक्य नाही. त्यामुळे सभा घेणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. मलकापूरला निधी दिला, विकासही केला. तेथे मनोहर शिंदेंनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी कल्पना द्यायला हवी होती. श्री. शिंदे जाणार आहेत, याची मला माहिती होती. मात्र, त्यांनी स्वतःहून सांगितले असते, तर आशीर्वाद दिला असता, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.