
“Balasaheb Patil at Sahyadri urges leaders to maintain loyalty and avoid short-term temptations.”
Sakal
मसूर : सहकारी साखर कारखान्याकडे सर्व सभासद उत्पादकांचा ऊस स्वीकारण्याची जबाबदारी असते. मात्र, खासगी कारखान्यांचे वाढते संकट सहकार क्षेत्रासाठी आव्हान आहे. खासगी कारखान्यांमध्ये कामगारांना १२ तासांच्या ड्यूटीला भाग पाडले जाते, तर सहकारी कारखाने माणुसकी, सामाजिक बांधिलकी जपतात, असे प्रतिपादन सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.