Mahadev Jankar
sakal
सातारा : ‘‘भाजपला आम्ही सत्तेत येण्यास मदत केली. त्याची माफी मागायला मी येथे आलो आहे. चुका झाल्या. त्या आता सुधारू. शरद पवारांचा, उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला. माझे चार आमदारही पळवून नेले.’’ लोकशाही संपवून देशात हुकूमशाही सुरू झालीय; पण पुढचे सरकार त्यांचे येणार नाही, तर आपले येणार असल्याचे सांगत त्यांनी सुवर्णादेवी पाटील यांच्यासह आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सातारकरांना माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले.