esakal | व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा : येथील पोलिसांनी (Police) धडक कारवाई करून अपहरण केलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाची सहा तासांत सुटका करून चार संशयितांना अटक करण्यात आली. बारामती तालुक्यातील आकाश रघुनाथ टेंगळे (वय २८, रा. मानोपोवाडी (पणदरे), अल्ताफ अब्बास इनामदार (वय ४०, रा. म्हस्कोबाचीवाडी (पणदरे), राहुल भारत सोनवणे (वय ३३, माळेगाव बुद्रुक) व कुलदीप चंद्रकांत जावळे (वय २४, रा. माळेगाव बुद्रुक) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले, की काल विटा (जि. सांगली) येथील व्यापारी व त्यांचा मुलगा पुणे येथून सांगलीला परत जाताना अनोळखी व्यक्तीने व्यापाऱ्याच्या मुलाच्या मोबाईल फोनवर फोन करून व्यवसायनिमित्त बोलायचे आहे, असे सांगून त्यांना पारगाव एसटी स्टँडजवळील बिअर बारमध्ये बोलावून घेतले.

हेही वाचा: कोल्हापूर : व्यापारी बैठकीतील निर्णयांचा अंमल

त्याप्रमाणे व्यापारी व मुलगा आले असता उसने घेतलेले पैसे परत करा, अन्यथा मुलगा अनिकेत यास घेऊन जाऊ, असे सांगून जीपमध्ये मुलास घालून चार जण गेले. यानंतर तपासाची गती फिरवून खंडाळा पोलिसांनी माळेगाव (ता. बारामती) येथून सहा तासांत संशयितास जेरबंद केले. या घटनेची फिर्याद मिलिंद भगवान टिके (सध्या रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली) यांनी दिली. तपास पोलिस शशिकांत क्षीरसागर करत आहेत.

loading image
go to top