esakal | तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना! वर्येत मित्राच्या स्मृतीसाठी साकारलं 'मैत्रीचं झाड'
sakal

बोलून बातमी शोधा

Friendship Tree

तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना! वर्येत मित्राच्या स्मृतीसाठी साकारलं 'मैत्रीचं झाड'

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : मित्र (Friendship) म्हणजे सुख-दुःखाचा भागीदार. आयुष्यातील (Life) प्रवासाचा साक्षीदार. अशाच सहृदयी मित्राच्या अकल्पित, आकस्मिक जाण्याने व्याकुळ झालेल्या मित्र परिवाराने त्याच्या आठवणी जपताना 'मैत्रीचे झाड' (Friendship Tree) साकारले आहे. त्यातून मोठा निधी जमवत त्याचा विनियोग कोरोनाग्रस्तांसाठी केला आहे. (Friends Planted Friendship Tree At Varye Satara News)

प्रशांत पांडुरंग कदम हे या दुर्दैवी मित्राचे नाव. नुकतेच अल्प आजाराने त्यांचे निधन झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते पुढे आले होते. कोयना प्रकल्पातून स्थलांतरित झाल्यानंतर मोठ्या कष्टाने त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे रयत शिक्षण संस्थेत ते शिक्षक म्हणून दाखल झाले. वर्ये (ता. सातारा) येथील विद्यालयात ते कार्यरत होते. सध्याच्या भीषण काळाने त्यांना ऐन उमेदीच्या वयात हिरावून नेले. लोकसंग्राहक वृत्तीमुळे कदम यांचा मित्र परिवार मोठा आहे. विद्यार्थी, शिक्षक अन्‌ समाजप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जात. रयत गुरुकुल प्रकल्प प्रमुख, अटल टिंकरिंग लॅब, सायन्स लॅबचे सर्वेसर्वा, आरएसपी विभागाचे उत्कृष्ट अधिकारी, गणित आणि विज्ञानाचे हाडाचे शिक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते.

हेही वाचा: वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत तातडीने पोचा; शंभूराज देसाईंच्या सक्त सूचना

रयत इन्स्पायर ऍवॉर्ड प्रकल्प, रयत विज्ञान परिषद प्रकल्प, रयत इनोव्हेटिव्ह सेंटर, प्रश्नपत्रिका निर्मिती या उपक्रमांत तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या अकल्पित, आकस्मिक निधनानंतर त्यांचे सर्व मित्र एकत्र आले. त्यांनी आपल्या जिवलग मित्राच्या आठवणी जपताना 'मैत्रीचे झाड' ही संकल्पना राबविली. त्यातून स्वेच्छेने मदतनिधी उभारला. दोन दिवसांत या मित्रांनी जवळपास एक लाख रुपये जमा केले. त्यातील 25 हजार रुपये सातारा येथील जम्बो कोविड रुग्णालयातील रुग्णांच्या अल्पोपाहारासाठी देणगी म्हणून सुपूर्द करण्यात आले आहेत. 25 हजार रुपये वर्णे (ता. सातारा) येथील कोविड सेंटरसाठी देण्यात आले आहेत. उर्वरित 50 हजार रुपये हे कायम ठेव म्हणून ठेवण्यात येणार आहेत. त्यातील व्याजाची रक्कम ही इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक रूपाने देण्यात येणार आहे.

प्रशांत कदम हे एक आदर्श, निष्ठावंत अन्‌ सच्चे रयतसेवक होते. मित्रांच्या गळ्यातला ताईत होते. त्यांच्या आठवणींना तोड नाही. सरांची शैक्षणिक बांधिलकी, विचारांचा वारसा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जपण्यासाठी "मैत्रीचे झाड' ही संकल्पना साकारली आहे.

-मैत्रीचे झाड परिवार, सातारा

तौक्ते वादळाचा स्ट्रॉबेरीला दणका; महाबळेश्‍वरात शेतकऱ्यांची स्वप्नं जमीनदोस्त

Friends Planted Friendship Tree At Varye Satara News

loading image
go to top