esakal | वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत तातडीने पोचा; शंभूराज देसाईंच्या सक्त सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Shambhuraj Desai

वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत तातडीने पोचा; शंभूराज देसाईंच्या सक्त सूचना

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : वादळाने नुकसान झालेल्या वाड्यावस्त्यातील प्रत्येक नुकसानग्रस्तापर्यंत पोचून दोन दिवसांत पंचनामे सादर करा. त्यामध्ये अजिबात दिरंगाई करू नका, अशा स्पष्ट सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी आज संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (Minister Shambhuraj Desai Inspected The Crop Damage Caused By Rain Satara News)

विभागात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मंत्री देसाई यांनी आज पाहणी केली. त्यानंतर येथील पोलिस ठाण्यात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार योगेश्वर टोंपे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्यासह महसूल, वीज, पाणीपुरवठा, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वादळी पावसामुळे ढेबेवाडी विभागातील निगडे, शिबेवाडी (गुढे), अंबवडे खुर्द, चाळकेवाडी, मंद्रुळकोळे आदी ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा: चक्रीवादळात केळीच्या बागा भुईसपाट; विंग परिसरात 20 लाखांचे नुकसान

यातील काही ठिकाणी मंत्री देसाई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. विभागातील एकूण नुकसानीचा बैठकीत आढावा घेतला. ते म्हणाले, ""पावसाळा तोंडावर आहे. उद्‌ध्वस्त निवारे तातडीने पुन्हा उभे राहण्याच्या दृष्टीने नियोजन करा. कुणीही नुकसानग्रस्त पंचनाम्यापासून वंचित राहता कामा नये. वाड्यावस्त्यांवर पोचून माहिती घेऊन दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम संपवा. वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करा.''

Tauktae Cyclone : अंबवडेत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; नुकसान होऊनही पंचनामे नाहीत!

Minister Shambhuraj Desai Inspected The Crop Damage Caused By Rain Satara News

loading image