
Sakshi Jadyal celebrates her achievement at Satara Hill Marathon, a testament to hard work and dedication.
Sakal
-प्रशांत घाडगे
सातारा: मी मूळ चिपळूणची. आई-वडील दोघेही शेतकरी. घरात परिस्थिती साधारण, लहान बहिणीचे शिक्षण सुरू आहे; पण या सगळ्याच्या पलीकडे एक मोठं स्वप्न होतं काहीतरी करून दाखवायचं..! त्या स्वप्नांना आकार देण्यासाठी रोज उन्हात, पावसात, थंडीमध्येही मी धावत राहिले. त्यामुळेच अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर सातारा हिल मॅरेथॉनवर यशाची मोहोर उमटविली अन् घामाच्या प्रत्येक थेंबाच्या फलित झाले. हे यश केवळ माझे नसून माझ्या आई-वडिलांचे आहे, ज्यांनी कधीच माझ्या स्वप्नांना थांबवले नाही, असे भरलेल्या आवाजात सांगत होती साक्षी जड्याळ.