

Tigress Begins New Journey in Sahyadri After Successful Relocation
Sakal
कऱ्हाड : ताडोबातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतर झालेली दुसरी वाघीण ताराने सॉफ्ट रिलीज पिंजऱ्यातून आज सकाळी सातच्या सुमारास व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात मुक्त संचारासाठी झेप घेतली. त्यामुळे तारा वाघिणीचे (एसटीआर -०५) सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यशस्वीपणे नैसर्गिक जंगलात स्थानांतर झाल्याचे वन्यजीव व व्याघ्र प्रकल्पाने जाहीर केले.