esakal | सातारा जिल्ह्यात 111 कामांसाठी 8.33 कोटी निधी मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा जिल्ह्यात 111 कामांसाठी 8.33 कोटी निधी मंजूर

कोरोनाच्या काळातही आवश्‍यक कामांना जिल्हा परिषदेचे प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधींची तरतूद केली जात आहे.

सातारा जिल्ह्यात 111 कामांसाठी 8.33 कोटी निधी मंजूर

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १११ विकासकामांसाठी आठ कोटी ३३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. कोरोनाच्या काळातही आवश्‍यक कामांना जिल्हा परिषदेचे प्राधान्य देत विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधींची तरतूद केली जात आहे.

हेही वाचा: सातारा: जनावरं चारण्‍यास मनाई केल्याने वनमजुरास मारहाण

जिल्ह्यातील कोरोनाच्या काळात रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद विविध विभागांना निधी उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे, प्रलंबित कामे पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने बांधकाम विभागाने विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. कोरोनाच्या काळातही जिल्ह्यातील आवश्‍यक कामांना जिल्हा परिषदेने प्राधान्य देत तत्काळ कामे पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. या कामांचे वाटप यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी सांगितली.

हेही वाचा: सातारा: दक्षिण भागातील सांगवी-मेढा मार्गावरील रस्ता खचला

गेल्यावर्षी कोरोनाच्या काळात लॉकडाउन असल्याने मार्च महिन्यापासून विविध कामे खोळंबलेली होती. तसेच, जिल्हा परिषदेतही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक कर्मचारी बाधित होत असून २२ हून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे, जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कामांसाठी नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विकासकामे रखडलेली होती. गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर विविध प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या धडाका जिल्हा परिषदेने सुरू केला आहे.

loading image
go to top