esakal | मूर्ती कलेतील 'ते' जुने दिवस परतले; ज्येष्ठ कारागिरांची हात कलाकारी
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2021

मूर्ती कलेतील जुने दिवस परत आल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात दृष्टीला पडत आहे.

मूर्ती कलेतील 'ते' जुने दिवस परतले; ज्येष्ठ कारागिरांची हात कलाकारी

sakal_logo
By
राजेश पाटील

ढेबेवाडी (सातारा) : मोबाईल, कॅलेंडर किंवा चित्रातील गणेशमूर्ती दाखवून साच्यांशिवाय तशाच हुबेहूब मूर्ती कारागिरांकडून बनवून घेण्याकडे सार्वजनिक मंडळांसह नागरिकांचाही कल वाढला आहे. मात्र, ग्रामीण भागात अशी कलाकारी करणारे जुन्या पिढीतील फारच थोडे कारागीर हयात असल्याने वाढत्या मागणीचा त्यांच्यावर अतिरिक्त ताण आल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav 2021) अगदीच तोंडावर आल्याने शाडू मातीपासून बनविलेल्या या मूर्ती सुकवून रंगकामांची एकच लगबग कुंभारवाड्यात सध्या सुरू आहे.

मूर्ती कलेतील जुने दिवस परत आल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून या परिसरात दृष्टीला पडत आहे. अनेक कारागीर बदलत्या जमान्यानुसार तयार गणेशमूर्ती शहरातून येथे विक्रीसाठी आणत असले, तरी काही गावच्या कुंभारवाड्यातील जुन्या पिढीतील कारागीर मात्र, कला व परंपरेचा जुनाच वारसा आजही जपताना दिसत आहेत. कोणत्याही साच्यांशिवाय मोबाईल, कॅलेंडर किंवा चित्रातील गणेशमूर्ती हस्तकलेद्वारे हुबेहूब बनवून देणारे असे फारच थोडे कारागीर या परिसरात असून, त्यांच्याकडून मूर्ती बनवून घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. काही गणेश मंडळांचाही त्यात समावेश आहे.

हेही वाचा: बाजारपेठेतून 'चायना' माल हद्दपार; देशी विद्युत माळांनाच पसंती

याबाबत सांगताना येथील कुंभारवाड्यातील जुन्या पिढीतील कारागीर सीताराम कुंभार व त्यांचे बंधू सर्जेराव कुंभार म्हणाले, ‘‘ही एक परंपरागत हाताची कला आहे. ज्या पद्धतीने साच्याद्वारे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये काम होते, तसे झटपट काम इथे होत नाही. शाडूच्या मातीला चित्रांप्रमाणे आकार देत मूर्ती साकाराव्या लागतात. त्यासाठी खूप वेळही द्यावा लागतो. मात्र, अशा मूर्ती बनवून घेण्याकडे कल वाढल्याने आमच्यावर कामाचा ताणही वाढलेला आहे.’’

loading image
go to top