esakal | बाजारपेठेतून 'चायना' माल हद्दपार; देशी विद्युत माळांनाच पसंती
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav 2021

सजावटीच्या साहित्यात आवर्जून ठाण मांडणाऱ्या ‘चायना’ माळा (China lighting) हद्दपार झाल्या आहेत.

बाजारपेठेतून 'चायना' माल हद्दपार; देशी विद्युत माळांनाच पसंती

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : सजावटीच्या साहित्यात आवर्जून ठाण मांडणाऱ्या ‘चायना’ माळा (China lighting) हद्दपार झाल्या आहेत. अस्सल भारतीय बनावटीच्या, लुकलुकणाऱ्या विद्युत दिव्यांच्या माळा, वेगवेगळ्या रंगांचे प्रकाशझोत टाकणारे विद्युत दिवे (Electric lights) यावर्षी गणरायाची (Ganeshotsav 2021) मखरे, मंडप आणि परिसर झगमगून जाणार आहे.

गणरायाच्या मखरासह परिसरही प्रकाशमान व्हावा, यासाठी यावर्षी लुकलुकणाऱ्या विद्युत दिव्यांच्या माळांच्या विविधतेत फारशी भर पडली नाही. मात्र, आता भारतीय बनावटीच्याच माळा बाजारपेठेत उपलब्ध आहेत. फुलांत, फळांत आणि आकर्षक आकारांतील प्रकाशमान दिवे नागरिकांना भुरळ घालत आहेत. गणरायाची सजावट चांगली व्हावी, यासाठी दरवर्षी कलाकार काही तरी नवीन सादर करत नागरिकांना आकर्षित करतात. टायमिंगवर लुकलुकणाऱ्या माळा, विद्युत दिव्यांनी मढवलेली मखरे, समई, उदबत्त्या असे सारे काही बाजारपेठेत उपलब्ध आहेच.

हेही वाचा: ग्रामीण भागातही आर्टिफिशल फुलांचे लोण; हार व तोरणांनी दुकानं सजली

नागरिकांची तीन ते पाच फूट लांबीच्या जंबो विद्युतमाळा, विविध रंगांतील चमकीच्या, तसेच स्टार व फोल्डिंग प्रकारातील माळांना मागणी आहे. त्याचबरोबर झेंडू, जास्वंद, लिली, दुर्वा इत्यादी प्रकारच्या फुलांच्या माळांना मागणी आहे. दरम्यान, गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आल्याने आज बाजारपेठेत राजवाडा परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील पथावर नागरिकांची खरेदीसाठी वर्दळ वाढली होती.

हेही वाचा: गणेशोत्सवात साताऱ्यातून 150 जादा बस

विद्युतदिवे मढविलेले चौरंग विक्रीस

विविध प्रकारचे प्रकाशझोत टाकणारे फोकस बल्ब ९० ते १,२०० रुपयांपर्यंत आहेत. विद्युतमाळा या आठ ते ३५० रुपयांपर्यंत आहेत. विद्युत कंदील हे १२० रुपयांपर्यंत विकले जात आहेत. श्री गणेशाला विराजमान करण्यासाठी बाजारपेठेत विद्युतदिवे मढविलेले चौरंगही विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

loading image
go to top