
कोरेगाव : त्रिपुटी-जांब बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील रघुनाथमल दरगाजी ओसवाल विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या गणेशोत्सवात गुरुजनांचा मार्गदर्शनाखाली पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेले निरपराध भारतीयांना आकर्षक देखाव्याने आदरांजली वाहिली आहे. या देखाव्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.