A mini Varanasi made in London.
sakal
सकाळ वृत्तसेवा
केळघर,:गणेशोत्सव आणि मराठी माणूस यांचे नाते केवळ एका सणापूरते मर्यादित नसून गणेशोत्सव हा मराठी संस्कृतीचा ,अस्मितेचा आणि सामाजिक जीवनाचा श्वास आहे. हे नाते श्रद्धा तसेच जिव्हाळा, परंपरा आणि सामुहिक ऊर्जेने विणलेला आहे. साता समुद्रापार असलेल्या इंग्लंड मधील लंडन शहरात नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या केळघर गावचे सुपुत्र गणेश वसंतराव गाडवे यांनी मराठमोळ्या पध्दतीने गणरायाची स्थापना केली असून गेल्या अनेक वर्षांपासून ते गणेशोत्सव उत्साहात खास मराठी परंपरेचा बाज राखून साजरा करत आहेत. यंदा वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर व गंगा किनाऱ्यावरील घाटांची प्रतिकृती त्यांनी गणेशोत्सव निमित्त साकारली आहे.