esakal | निवडणूक विभाग, गणेशोत्सव समितीच्यावतीने जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Festival

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

निवडणूक विभाग, गणेशोत्सव समितीच्यावतीने जनजागृतीसाठी स्पर्धेचे आयोजन

sakal_logo
By
- हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा): मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि बृहन्मुबंई गणेशोत्सव समन्वय समितीच्यावतीने “उत्सव गणेशाचा जागर मताधिकाराचा” या विषयावर घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना 21 हजार, 11 हजार आणि पाच हजार रुपयांचे प्रथम तीन बक्षिसे आणि पाच हजारांचा दहा उत्तेजनार्थ बक्षिस ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिले आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळांना देखाव्यांच्या आयोजनावर असलेली बंधने लक्षात घेऊन घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जावा. मताधिकार हा 18 वर्षावरील नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने आपले नाव मतदार यादीत नोंदवणे, मताधिकार बजावणे आवश्यक आहे, हे सूत्र केंद्रस्थानी ठेवून गणेश-मुखराची सजावट, गणेश दर्शनासाठी घरी येणाऱ्या भाविकांमध्ये, नातेवाईकांमध्ये मतदार नाव नोंदणी संबंधीची जागरुकता करण्यासाठी अभिनव कल्पना, मताधिकार बजावताना जात, धर्म, पंथ, निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर अमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे यासारख्या विषयांवर घरगुती गणेश उत्सव सजावटीतूनही जागृती करता येऊ शकते. स्पर्धेमध्ये अधिकाधिक नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आव्हान मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे , जिल्हा निवडणूक अधिकारी शेखर सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता सावंत-शिंदे, मतदार नोंदणी अधिकारी उत्तम दिघे, प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर, निवडणुक नायब तहसीलदार पी. के. पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

नाव नोंदणी करण्याचे आवाहन

एक जानेवारी 2022 या दिनांकावर आधारित मतदार यादी यांच्या पूनःनिरीक्षणाचा कार्यक्रम एक नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्यक्रम सुरू होत आहे. त्यामुळे एक जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नवमतदारांची नोंदणी साठी संबंधित बीएलओ यांच्याकडे अर्ज सादर करण्याचे आव्हान मतदार नोंदणी अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

loading image
go to top