
कऱ्हाड : व्यापक बदल हा चटकन होत नाही. तो हळूहळूच होतो. किंबहुना, हळूहळू झालेला बदलच टिकाऊ असतो. त्याची प्रचीती येथील पर्यावरणपुरक गणेशमुर्ती विसर्जनात आले. चार-पाच वर्षापुर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत असलेली पर्यावरणपुरक गणेशमुर्तींचे विसर्जन आज चार हजार ९३० च्या घरात पोहचले आहे. त्याचबरोबर साडेतीन टन निर्माल्यही पालिकेकडे जमा झाले. यातुन कऱ्हाडकरांनी पर्यावरण रक्षणालाच हातभार लावत आपले राष्ट्रीय कर्तव्य जपुन नदी प्रदुषण रोखण्यासही हातभार लावला आहे.
गणेशोत्सवाला आलेलं विकृत स्वरूप जावं, त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसावा आणि गणेशोत्सवाचं पावित्र्य व श्रध्दतेला खरा मानसिक आनंदाच महत्त्व पटावं, यासाठी गेली दोन दशकं विविध स्तरांवर प्रबोधन होत सुरु आहे. ही प्रबोधनचळवळ आज चांगली प्रस्थापित आणि सुसंघटित झाली आहे. त्याला लोकसहभागातून कृतीची जोड मिळून ती वृध्दींगत होत आहे. मुर्तींचे विसर्जन नदी, तलाव किंवा समुद्रातच व्हायला हवं, ही कल्पना लोकांच्या मनात पक्क घर करून बसली आहे. गणेशमुर्ती विसर्जनामुळे होणाऱ्या नदी, तलाव या मौल्यवान जलस्रोतांना प्रदूषणाच्या विळख्यातुन बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणुन येथील पालिका आणि एनव्हायरो नेचर फ्रेंडस क्लबच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासुन पर्यावरण पुरक गणेशमुर्तींच्या विसर्जनाची कऱ्हाडकरांना साद घालण्यात आली.
मुर्तीच्या रंगातील आरोग्यास घातक असणाऱ्या रसायनामुळे होणारे परिणाम, पाण्याचे प्रदुषण याही बाबी लोकांसमोर मांडण्यात आला. पहिल्या टप्यात त्याला फारसे यश आले नाही. मात्र गेल्या चार वर्षापासुन मुर्तींच्या पर्यावरण पुरक विसर्जनाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यासाठी पालिकेतर्फे कृष्णा घाट, दत्त चौक, कृष्णा नाका, पी. डी. पाटील उद्यान, शिवाजी हौसिंग सोसायटी, शाहु चौकासह आदीसह २१ ठिकाणी जलकुंड तयार केले होते. दीड दिवसांच्या गणेश विसर्जनापासून नागरीकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रतिसाद दिला. पर्यावरण पुरक विसर्जित केलेल्या मूर्ती ट्रॅक्टमधून पालिकेच्या नवीन जलशुध्दीकरण केंद्रानजीक शाडू व प्लॅस्टरच्या मूर्तीसाठी केलेल्या दोन स्वतंत्र कृत्रिम तळ्यात विधीवत विसर्जित केल्या जात होत्या. दरम्यान, घरगुती मूर्तीसह पाच मडळांनीही पर्यावरण पुरक विसर्जन केले.
घरच्या घरी विसर्जनालाही प्रतिसाद
यंदाच्या गणेशोत्सवात काही नागरीकांनी शाडूच्या मुर्ती घरीच तयार केल्या होत्या. त्याचबरोबर येथील कुंभारवाड्यातुनही शाडूच्या मुर्त्याना नागरीकांनी मागणी केली. त्यांचे विसर्जनही अनेक नागरीकांनी घरच्या घरीच बादली, टफमध्ये करुन पर्यावरण पुरक विसर्जनाला हातभार लावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.