
सातारा : महानगरांप्रमाणे साताऱ्यात रूढ होत असलेले बाप्पाच्या आगमन सोहळ्यास शहरातील मंडळांची एकजूट व समन्वय समितीच्या पाठपुराव्याला आज यश लाभले. प्रशासनाकडून १६ आणि २३ आॅगस्ट या दोन दिवशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना त्यांचा बाप्पा वाजत गाजत आणण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, मंडळांनी ध्वनी यंत्रणेचा आवाजाची मर्यादा कमीत कमी ठेवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले.