esakal | कऱ्हाडचा कचरा गोळा करण्याची व्यवस्था कोलमडली
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हाडचा कचरा गोळा करण्याची व्यवस्था कोलमडली

शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद पडल्या.

कऱ्हाडचा कचरा गोळा करण्याची व्यवस्था कोलमडली

sakal_logo
By
सचिन शिंदे,तुकोबाराय पालखी सोहळा

कऱ्हाड (सातारा): शहरातील घंटागाड्यांच्या नविन निविदेची वर्क तयार आहे. मात्र त्या ठरावावर स्वाक्षऱ्या झाल्या नसल्याने शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या बंद पडल्या. नवीन ठेकेदाराच्या वर्क आॅर्डरच्या ठरावावर स्वाक्षरी नसल्याने त्यांना प्रत्यक्ष वर्क आॅर्डर नाही तर जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्याने १८ घंटागाड्यांसह तीन ट्रॅक्टरव्दारे कचरा गोळा केला जातो. ती प्रक्रीया बंद पडल्याने शहरातील सरासरी आठ टन कचरा गोळा केला गेला नाही. तर रस्ते सफाई व गटर स्वच्छ करण्याचे कामही झाले नाही. तेही कर्मचारी कामावर जाऊ शकले नाहीत.

हेही वाचा: लॉकडाउन नियमांचं उल्लंघन; कऱ्हाड, पुसेगावातील 18 दुकानं सील

आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनी कर्मचाऱ्यांना विनंती केली. मात्र कर्मचाऱ्यांनी जबाबदारीचा मुद्या पुढे केल्याने त्यांनाही काही बोलता आले नाही. त्यामुऴे मुळ शहरात घंटागाड्या न फिरल्याने घरोघरचा कचरा आज तसाच पडून राहिला. वर्क आॅर्डर तयार आहे, मात्र ठरावावर नगराध्यक्षांनी स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केली असल्याने हा प्रश्न उद्दभवला आहे, असे आरोग्य सभापती वाटेगावकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: साताऱ्याला घट्ट विळखा; कऱ्हाड, खटाव, कोरेगांव, फलटणात धोका कायम!

ते म्हणाले, ३० जून रोजी जुन्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. जुन्या ठेकेदाराला दहा दिवसांची मुदत वाढ आहे. नविन ठेकेदाराची प्रक्रीया पूर्ण आहे. त्याची वर्क आॅर्डरही तयार आहे. मात्र त्याच्या ठरावावर नगराध्यक्षांनी स्वाक्षरी न केल्याने आज कचरा उचलला गेला नाही. ही स्थिती योग्य नाही. वेळीच ठरावावर स्वाक्षरी होणे गरजेचे आहे.

loading image