esakal | शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; भाजप शिक्षक आघाडीची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; भाजप शिक्षक आघाडीची मागणी

शिक्षक, कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्या; भाजप शिक्षक आघाडीची मागणी

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा यासह शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाच्या शिक्षक आघाडीने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाचा एक भाग म्हणून तालुक्यातील शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

समाजातील महत्त्वाचा घटक असूनही शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करूनही राज्य शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. म्हणून शिक्षकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन दिल्याचे भाजप शिक्षक आघाडीचे तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा: दौंड : उप अधीक्षकांना बदलीची धमकी देणार्यास अटक

या वेळी गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिक्षकांना महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळावे, परिविक्षाधीन सहायक शिक्षक, परिविक्षाधीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वाढवावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, सीबीएसई शाळेतील शिक्षकांसाठी शाळा न्यायाधिकरणाची स्थापना करावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या.

जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, अनिल शिर्के, अशोक सोमदे, तानाजी पवार, विशाल साळुंखे, संतोष अंबवडे, शुभांगी कोरडे, भारती निकम यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top