Karad Crime: 'सैदापूरला दोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीस'; शहर पोलिस ठाण्यात फिर्याद
Saidapur House Burglary: पर्समध्ये एक लाख २० हजार रुपयांचा सोन्याचा राणीहार, ६० हजारांचा नेकलेस आणि नथ असा सुमारे दोन लाखांचा ऐवज होता. दरम्यान, बाळ रडल्याने प्रियांका या बाळाला घेऊन खाली बसल्या. मुहूर्त झाल्यानंतर सव्वादोन वाजता त्या पुन्हा हॉलमध्ये आल्या.
कऱ्हाड: बारशाच्या कार्यक्रमावेळी सुमारे दोन लाखांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील जनार्दन लॉन्समध्ये घडली. याबाबत प्रियांका शिंदे (वय २५, रा. यशवंतनगर, कऱ्हाड) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.