Satara Crime:'घरकाम करणाऱ्या महिलेने साडेदहा तोळे सोन्यावर मारला डल्ला'; घरातल्याचा आधी विश्वास संपादन, महिलेस अटक
घरात काम करणाऱ्या महिलेवर अधिकाऱ्यांचा संशय आला. त्यांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कसून चौकशी केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली.
Shocking! Maid Takes Advantage of Trust to Steal 10.5 Tola GoldSakal
सातारा : शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी घरकाम करणाऱ्या महिलेला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. सीमा संजय कोकरे (वय ४२, रा. शाहूपुरी) असे तिचे नाव आहे. तिच्याकडून साडेदहा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.