
वहागाव: तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोलनाक्यानजीक व वराडे गावच्या हद्दीतील महामार्गावरील श्रावणी हॉटेलसमोर रात्रीच्या वेळी उभ्या असणाऱ्या एसटीतील कुरिअर बॉयला मारहाण करून त्याच्याकडून सुमारे ९२ तोळे सोन्याचे दागिने व ३२ हजार पाचशे रुपयांची रोकड असा ७२ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीस साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेतले. सुमारे महिनाभरानंतर गुन्हा उघडकीस आला.