राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा 'विजयाचा' फ्लेक्स झळकताच पोलिसांनी काढला

Balasaheb Patil
Balasaheb Patilesakal
Summary

सहकारमंत्री पाटील व अॅड. उंडाळकरांना मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला आहे.

कऱ्हाड (सातारा) : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कऱ्हाड सोसायटी (Karad Society) गटात काल रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांना (Udaysingh Patil-Undalkar) मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला असून आता या मतमोजणीतून येणाऱ्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान, उद्या मंगळवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वीच सहकारमंत्र्यांच्या विजयाचा फलक गोळेश्वर ग्रामपंचायतीनं (Goleshwar Gram Panchayat) लावून सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र, पोलिसांना याची खबर मिळताच हा फ्लेक्स काढण्यात आला आहे. निवडणूक निकालाआधी फ्लेक्स लावण्यास कोणतीही परवानगी नसल्याने पोलिसांनी हा फलक तत्काळ हटवला आहे.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) कऱ्हाड सोसायटी गटातून खुद्द राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी घेतली. त्यांच्या विरोधात माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी उमेदवारी घेतली होती. त्यामुळं ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनलीय. सोसायटी गटात 100 टक्के मतदान झाले.

Balasaheb Patil
'आमदार शिंदेंची दहशत आम्हाला संपवायची होती, म्हणूनच आम्ही..'

सहकारमंत्री पाटील व अॅड. उंडाळकरांना मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला असून आता उद्या मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीतून येणाऱ्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान, या निवडणूक निकाल आधीच आज (सोमवारी) गोळेश्वर ग्रामपंचायतीनं सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या जिल्हा बँक निवडणुकीतील विजयाचा फलक लावला असून या फ्लेक्समध्ये भाजप नेते अतुल भोसले यांचा देखील फोटो असल्यानं सर्वांचं लक्ष वेधत आहे. कार्यकर्त्यांना सहकारमंत्री विजय होतील, असा ठाम विश्वास आहे.

Balasaheb Patil
सहकारमंत्र्यांविरोधात काँग्रेसच्या उंडाळकरांनी घेतली उमेदवारी अन्..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com