NCP च्या सहकारमंत्र्यांविरोधात काँग्रेसच्या उंडाळकरांनी घेतली उमेदवारी अन् लढाई प्रतिष्ठेची बनली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Balasaheb Patil

मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला असून आता या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलंय.

सहकारमंत्र्यांविरोधात काँग्रेसच्या उंडाळकरांनी घेतली उमेदवारी अन्..

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या कऱ्हाड सोसायटी (Karad Society) गटात काल रविवारी शांततेत 100 टक्के मतदान झाले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकरांना (Udaysingh Patil-Undalkar) मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला असून आता या मतमोजणीतून येणाऱ्या निकालाकडं राज्याचं लक्ष लागलंय.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी (Satara Bank Election) कऱ्हाड सोसायटी गटातून खुद्द राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी घेतली. त्यांच्या विरोधात माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी उमेदवारी घेतली होती. त्यामुळं ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनलीय. निवडणुकीच्या मतदानास काल रविवारी सकाळी कऱ्हाड येथील शिवाजी हायस्कूलमध्ये प्रारंभ झाला. सकाळच्या टप्प्यात सहकारमंत्री पाटील यांचे समर्थक मतदार एकगठ्ठा मतदानासाठी आणण्यात आले. त्यानंतर काही वेळानं उंडाळकर गटाचे समर्थक मतदार एकगठ्ठा आणण्यात आले. त्यामुळं तणाव निर्माण होवू नये, यासाठी पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पोलिसांनी सतर्क राहून बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा: राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या निकालाकडं राज्याचं लक्ष

सकाळी दहाच्या सुमारासच दोन्ही गटाच्या ९० टक्के समर्थक मतदारांचे मतदान झाले होते. त्यानंतर मतदान केंद्रावरील गर्दी कमी झाली. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सहकारमंत्री पाटील व उंडाळकर यांनी मतदान केले. त्यानंतर त्यांच्या राहिलेल्या समर्थकांनी मतदान केल्यानंतर १०० टक्के मतदान झाले. त्यानंतर नागरी बॅंका आणि इतर मागास प्रतिनिधी यांच्यासाठी पावणेपाच वाजेपर्यंत मतदान सुरु होते. कऱ्हाड सोसायटी गटात १४० पैकी १४०, नागरिक बॅंकामध्ये ६९ पैकी ६७ मतदान, तर महिला राखीव इतर मागासमध्ये ३३२ पैकी ३२५ मतदारांनी मतदान केले. कऱ्हाडला ९७.८९ टक्के मतदान झाले. सहकारमंत्री पाटील व अॅड. उंडाळकरांना मतदारांनी दिलेला कौल मतपेटीत बंद झाला असून आता या मतमोजणीतून येणाऱ्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: 'ज्यांना मी वाढवलं, तेच मला हद्दपार करायला निघालेत'

सहकारमंत्र्यांकडून पालिकेसाठीही चाचपणी

कऱ्हाड सोसायटी गटातून निवडणूक लढवत असलेल्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना भेटून समर्थन देण्यासाठी पालिकेचे उपसभापती जयवंत पाटील, पालिकेतील गटनेते राजेंद्र यादव, नगसेवक हणमंत पवार हे नगरसेवक सौरभ पाटील यांच्यासमवेत तेथे आले होते. त्याचबरोबर माजी नगरसेवक अशोकराव पाटीलही सहकारमंत्र्यांबरोबर मतदानासाठी आत गेले. त्यामुळे सहकारमंत्र्यांनी पालिकेच्या आगामी राजकारणासाठी चाचपणी केल्याची चर्चा त्या ठिकाणी होती.

हेही वाचा: 'आमदार शिंदेंची दहशत आम्हाला संपवायची होती, म्हणूनच आम्ही..'

loading image
go to top