esakal | गोंदवले : "श्री' महाराजांची परंपरा आजही राखली जात आहे
sakal

बोलून बातमी शोधा

gondavalekar maharaj

गोंदवले : "श्री' महाराजांची परंपरा आजही राखली जात आहे

sakal_logo
By
फिराेज तांबाेळी

गोंदवले (जि. सातारा) : कोरोनाच्या आपत्ती (Coronavirus) काळात गरजूंसाठी मदतीचा ओघ सुरू ठेवला असून बाधितांवर उपचारासाठी रुग्णालयासह (Hospitals) सुमारे 200 बेड व शिधा उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती श्री ब्रह्मचैतन्य महाराज (gondavalekar maharaj) संस्थानच्या विश्वस्तांनी दिली. (gondavalekar maharaj covid19 bed satara positive news)

गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर समिती चैतन्य रुग्णालयाच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांवर उपचार करते. त्यासाठी नामांकित डॉक्‍टर येथे येऊन सेवा करतात. औषधोपचारासह विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून हे रुग्णालय बंद आहे. प्रशासनाच्या मागणीवरून गेल्या वर्षीच रुग्णालयाची रुग्णवाहिका देण्यात आली आहे. त्याशिवाय म्हसवड येथील कोरोना केअर सेंटरसाठी आवश्‍यकतेनुसार बेड व गाद्या दिल्या आहेत, असे विश्‍वस्तांनी सांगितले.

या आपत्ती निवारणासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी 50 लाख व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 25 लाखांची मदत केली आहे. प्रशासनाच्या मागणीवरून ससून रुग्णालयात कोविड विभाग सुरू करण्यासाठीही 25 लाखांची मदत केली आहे. जिल्ह्यातील गरजूंना प्रशासनाच्या मदतीने 50 लाखांहून अधिक रकमेचा कोरडा शिधा देण्यात आला असल्याचे सांगून ते म्हणाले, ""दहिवडीत सुरू झालेल्या कोविड सेंटरसाठीही 60 बेड देण्यात आले आहेत. आवश्‍यकतेनुसार आणखी 140 बेड देण्याचे नियोजन आहे. संस्थानचा दवाखाना कोविड सेंटरसाठी देण्यात आला असून रुग्णांसाठी गरजेनुसार कोरडा शिधा प्रशासनाकडे देण्यात येणार आहे.

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

"श्री' महाराजांनी जात-पात, भाषा, लहान-मोठा असा भेदभाव केला नाही. "श्री' महाराजांची ही परंपरा आजही येथे राखली जाते. सर्व जातीधर्माचे कर्मचारी येथे कार्यरत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी प्रशासनाने मागणी करताच संस्थानने रुग्णालयाची रुग्णवाहिका दिली. या काळात अपघात होऊन रुग्णवाहिकेचे नुकसान झाले. ही रुग्णवाहिका लवकरच दुरुस्त हाेईल अशी आशा विश्वस्तांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: दाेन दिवसांत पैसे द्या ! अन्यथा PPE Kit घालून आंदोलन करु

हेही वाचा: राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस कार्यालयावर दगडफेक

gondavalekar maharaj covid19 bed satara positive news