
Flood Relief: Gondawlekar Trust Donates to CM’s Fund for Victims’ Aid
Sakal
गोंदवले: राज्यातील पूरग्रस्तांना श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर चैतन्योपासना ट्रस्टने मदतीचा हात दिला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश संस्थानच्या प्रतिनिधींनी नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. याशिवाय पूरग्रस्तांसाठी समाधी मंदिरातून शिधाही देण्यात आला असल्याची माहिती समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली.