

Maharashtra to Distribute Three Months of Ration Together from August
sakal
सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२६ या तीन महिन्यांचे रेशन धान्य एकत्रित वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. शिधापत्रिकाधारकांसाठी ही गुड न्यूज असली तरी रेशन दुकानदारांपुढे साठवणूक आणि वाहतुकीचा प्रश्न आहे, तसेच पॉस मशिनवर तीन महिन्यांचा कोटा दाखविणे आवश्यक आहे. शासनाकडून हे पॉस मशिन प्रत्येक महिन्याला बंद करण्याचा प्रकार होत असल्याने ग्राहक आणि रेशन दुकानदारांत वादाचे प्रसंग येणार आहेत.