
कऱ्हाड: भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने आरक्षण संपविण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे भाजपकडून आरक्षणाची अपेक्षा ठेवू नये. कुणबी समाजाला दाखले देण्याला आमचा विरोध नसून, सर्व कुणबी ओबीसीमध्येच आहेत. मात्र, नव्याने ज्या गॅझेटचा आधार घेऊन सर्व मराठा समाज कुणबी होईल, असे बोलले जात आहे. अध्यादेश काढून सरकारने ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष उभा केला आहे. त्यातून मराठा समाजाचीही फसवणूक करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.