Faltankar community shows strong support for Manoj Jarante-Patil’s protest, signaling renewed opposition to government policies.sakal
सातारा
Satara News:'मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला फलटणकरांचा पाठिंबा'; पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका
Maharashtra political agitation: मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्टला मुंबई होणाऱ्या आंदोलनासाठी तालुक्यातील प्रत्येक मराठा समाजाच्या घरातील एक व्यक्ती सहभागी होईल, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.
सांगवी: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमध्ये मराठा आंदोलकाची बैठक झाली. या लढाईत सहभागी होण्यासाठी फलटण तालुक्यातून हजारो मराठा बांधव २७ ऑगस्टला मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती मराठा आंदोलकांनी दिली.