
दहिवडी : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाच्या भावना विचारात घ्याव्यात. मनोज जरांगे- पाटील यांच्याशी चर्चा करून अनेक वर्षे रेंगाळत पडलेला आरक्षणाचा प्रश्न समन्वयाने मार्गी लावावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी सरकारला केली.