'ट्रेस, ट्रॅक, ट्रीट' मधून कोरोना आटोक्‍यात येईल : डॉ. साधना कवारे

संदीप गाडवे
Sunday, 27 September 2020

कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी आपण स्वत: ची काळजी घेणे जरुरीचे आहे. यासाठी आपण मास्क, सॅनिटाझरचा अधिक वापर करावा, जणे करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करु शकू, असे डॉ. साधना कवारे यांनी सांगितले.

केळघर (जि. सातारा) : "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेनुसार कोविड बाधितांच्या रुग्णांच्या निकट संपर्कातील रुग्णांचा शोध घेण्यासाठी "ट्रेस, ट्रॅक, ट्रीट' या त्रिसूत्रीचा वापर करून कोविड प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्यासाठी आरोग्य विभाग काम करत असून, या योजनेला सर्व स्तरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास नक्कीच कोरोना नियंत्रणात येईल, असा विश्वास येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे यांनी व्यक्त केला.
 
भुतेघर मुरा (ता. जावळी) येथे ग्रामस्थांना "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेची माहिती देताना डॉ. कवारे बोलत होत्या. या प्रसंगी समुदाय वैद्यकीय अधिकारी सुप्रिया मुळे, आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, आरोग्य सेविका आस्मा शेख, उपसरपंच कुंदा मानकुमरे, महादेव मानकुमरे, रामचंद्र मानकुमरे, बाजीराव जाधव, गणेश मानकुमरे, प्रदीप मानकुमरे, विकास मानकुमरे, अंगणवाडी सेविका उज्वला मानकुमरे आदींची उपस्थिती होती. 

ऐन कोरोनात रेशनवर धान्यटंचाई; एपीएलचे धान्य केले बंद!

डॉ. कवारे पुढे म्हणाल्या, कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी आपण स्वत: ची काळजी घेणे जरुरीचे आहे. यासाठी आपण मास्क, सॅनिटाझरचा वापर करावा, जणे करुन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करु शकू. यावेळी त्यांनी "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' या योजनेची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Scheme Started At Bhuteghar Mura Satara News